पुण्यात शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्‍याचार; शाळेच्या आवारातच…

पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्‍याचार   केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील गंज पेठेतील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सदर प्रकरणी महिला शिक्षकेला पोलिसांनी अटक केली असून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्‍सो कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या एका शाळेच्‍या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत आहे. बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या  प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला. आरोपी महिला सुद्धा या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी येथे वास्तव्यास आहे. अल्‍पवयीन विद्यार्थ्याला तिने त्‍याला प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. आरोपी महिला शिक्षिकेने त्‍याला तिच्‍यासोबत शाळेच्‍या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्‍यासाठी भाग पाडले. ही शाळा प्रशासनाला कळताच शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनाने संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात कळवले तसेच तिला अटकही करण्‍यात आली.

शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली.पुण्यातील पबने सेलिब्रेशनच्या नावाखाली टोक गाठलं-नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..