रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत दोध्ये शिवारात तसेच नेहते शिवारात पोलीस स्टेशनचे तपास पथक मधील अमलदार यांनी हातभट्टी वर कारवाई करून दोन गुन्हे दाखल केले,

असून त्यामध्ये पहिल्या गुन्ह्यात पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून आरोपी नामे कैलास पहानु तायडे राहणार नेहते याच्यावर कारवाई करण्यात आली असून दुसऱ्या गुन्ह्यात बारा हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून आरोपी नामे सुपडू भिसन तायडे नेहते यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पो हवा सुभेदार तडवी, पो शी विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे, महेश मोगरे, यांनी केली आहे.









