माध्यमिक विद्यालय उमर्दे बु !शाळेचा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिसरा क्रमांक

माध्यमिक विद्यालय उमर्दे बु !शाळेचा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिसरा क्रमांक

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश सुतार विखरण- नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार, नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 45 व्या नंदुरबार तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन अंजनाताई सुनिल वसावे सभापती पंचायत समिती नंदुरबार, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी ता. साक्री जि.धुळे येथील संस्थेचे सचिव,नरेंद्र आत्माराम देवरे होते.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.नंदुरबार यांच्या हस्ते रिमोट कंट्रोल द्वारे करण्यात आले.नंदुरबार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविकाद्वारे मेळाव्याची प्रस्तावना मांडली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उर्मिला पारधे शिक्षणाधिकारी योजना (जि.प.नंदुरबार), खोंडामळी गटाचे जि.प.सदस्य शांताराम पाटील,विखरण येथील सरपंच निर्मलाताई मराठे, उपसरपंच सुनिता बाई पवार, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष मुकेश पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित मराठे, विस्तार अधिकारी डॉ.सचिन गोसावी,एस.एन. पाटील,जयवंत चौरे,व्ही.डी. पाटील,अनिल अहिरे,सर्व केंद्र प्रमुख, तालुक्यातील मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाने जेवढी प्रगती केली आहे त्याचा पुढे सदुपयोग करून जीवनमान उंचावण्यात अग्रेसर व्हावे असे आवाहन नव्या पिढीला केले. या विज्ञान प्रदर्शनामधून प्राथमिक गटातून ५१ माध्यमिक गटातून ७३शिक्षक साहित्य निर्मिती गटातून २३ तसेच प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटातून दोन असे एकूण १४९ वैज्ञानिक उपकरणांचा सहभाग नोंदवण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.आर. बागुल तर आभार एस.एच. गायकवाड यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती नंदुरबार,नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, कपूरचंद मराठे सचिव, फैयाज खान श्री‌.आप्पासोआ.ध. देवरे माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके देवरे विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारींनी व विद्यालयातील परिसरातील शाळांचे विज्ञान, गणित शिक्षकांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..