जयपूर आगीत 14 जणांचा मृत्यू, 80 जखमींवर उपचार सुरू

जयपुरमध्ये एका सीएनजी टँकरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला आणि 80 हून अधिक जखमी झाले. 40 पेक्षा जास्त वाहने जळून खाक झाली. काही मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.  जयपूर येथे 20 डिसेंबर रोजी आगीची मोठी भीषण घटना घडली. सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, 14 लोकांचा मृत्यू झाला आणि आजुबाजूच्या तब्बल 40 पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले तर 30 लोकांची स्थिर गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला. या आगीच्या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या भीषण अपघातात अनेक मृतांचे मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळखही पटत नाहीये. अशा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाच मृतांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. या आगीच्या घटनेत एक बस जळून खाक झालीये. या बसबद्दलची मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. या बसचे परमिट हे 16 महिन्यांपूर्वीच संपले होते. आगीच्या घटनेचा तपास केला जातोय. या प्रकरणी काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात. आगीच्या घटनेने लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण हे बघायला मिळतंय. आग इतकी जास्त भीषण होती की, आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत होत्या. आगीनंतर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. आगीत जळून खाक झालेली वाहने पोलिसांकडून क्रेनच्या मदतीने इतर ठिकाणी हलवण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी अजमेर रोडवरील पूर्ण वाहतूक थांबवली होती. अजमेर रोडवर ज्याठिकाणी ही घटना घडली, त्याच्या थोड्याच अंतरावर एक पेट्रोल पंप होता. सुदैवाने ही आग तिथपर्यंत गेली नाही. मात्र, अचानक सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरला आग नेमकी कशी लागली, याबद्दल अजून काही खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला नाहीये. दोषींचे गय केली जाणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न