तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांविरुद्ध कारवाई

तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांविरुद्ध कारवाई

जळगाव शहरातील शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणा-या पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत आज शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली.पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांच्या सहका-यांनी तसेच जळगाव शहर मनपा अतिक्रमण विभागाने चौबे शाळा व मनपा शाळा क्रमांक 17 च्या परिसरात ही कारवाई केली. या पान टपरी चालकांविरुद्ध यापूर्वी दंडात्मक कारवाई केली होती. तरीदेखील त्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरुच ठेवली होती. या परिसरातील सहा पान टपऱ्या कायमस्वरूपी हटवून त्या मनपा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या. पुढील दोन दिवसात उर्वरित पान टपरी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी म्हटले आहे.

इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा जळगाव, भिका लिंगा गवळी रा. गवळीवाडा जळगाव, गणी मोहमद डिगी रा. भिलपुरा जळगाव तसेच मनपा शाळा क्रमांक 17 परिसरातीलप्रकाश नामदेव पाटील रा बळीराम पेठ वअब्दुल करीम शेख इसा रा काट्या फाईल जळगाव यांच्या विरुद्ध आज कारवाई करण्यात आली. पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी, पोलीस उप निरीक्षक योगेश ढिकले, हेकॉ युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, पोलिस नाइक भागवत शिंदे, पो कॉ विकी इंगळे, पाटील, अनिल कांबळे तसेच जळगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय ठाकूर व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.