महिला अधिकाऱ्यासह दोन लाईनमन जळगाव एसीबीच्या जाळ्यात

महिला अधिकाऱ्यासह दोन लाईनमन जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच भुसावळ तालुक्यातील 34 हॉटेल व्यावसायिकांनी जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट असल्याचे भासवून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या बहाण्याखाली लाच मागणार्‍या तीन अधिकार्‍यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे.वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांची नावे समोर आली आहेत.

हे तिन्ही अधिकारी सावदा विभागातील पाडळसा कक्ष कार्यालयात कार्यरत होते. हॉटेल व्यावसायिकांनी जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या मोबदल्यात आरोपींनी सुरुवातीला 20 हजार रुपये लाच मागितली होती, नंतर ती 15 हजार रुपयांवर आणली आणि शेवटी चार हजार रुपयांवर तडजोड झाली. लाच स्वीकारताना संतोष इंगळेला एसीबीने अटक केली आणि नंतर दोघा संशयित आरोपींनाही अटक करून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.