तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात!

तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात!

राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले उदघाटन

 जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आले आहे. तर जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक बांधण्यात आले आहेत. या कारागृहाची बंदी क्षमता २०० इतकी असून यात प्रत्यक्ष ५२४ बंदी बंदिस्त आहेत. नविन बॅरेकच्या बांधकामामुळे कारागृहामध्ये ६० बंदी सामावून घेईल इतकी नवीन वाढीव क्षमता निर्माण झालेली आहे. या बॅरेक बांधकामाचे उद्घाटन कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक श्री डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. या जिल्हा कारागृहा करीता जिल्हा नियोजन समिती कडून एकूण १,१०,८०,२१३ रुपये निधी प्राप्त झाला होता. ज्यात पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक ७३,७७,५१४ रुपये व तृतीयपंथी बंद्याकरीता एक बॅरेक ३७,०२,६९९ रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आलेले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मदतीने कारागृहातील बंदयाचे टी.बी., एच आय व्ही, क्षयरोग, कुष्ठरोग, व इतर आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी नुसार बंदयावर उपचार देखील करण्यात आलेले आहेत. तसेच कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकरीता चार वॉचटॉवर, मुख्यप्रवेशव्दार, स्वयपांकगृह रंगरगोटीची कामे प्रगतीपथावर असल्याने  डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कामाची पाहाणी करून कामे तत्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बॅरेक बांधकामाच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक  नखाते, वरिष्ठ तुरुंगाधिकारी  गजानन विठ्ठल पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.