शासन सकारात्मक निर्णय घेईल डॉ. हनुमंत भोपाळे

शासन सकारात्मक निर्णय घेईल डॉ. हनुमंत भोपाळे

काय गोड तर काम गोड असते. कामाला सुस्वभावाची जोड असेल आणि आपल्याकडे कौशल्य अन् क्षमता असेल तर नक्कीच भवितव्य आहे, त्यामुळे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत असलेल्या युवकांनी सकारात्मक राहून प्रशिक्षणकार्य पूर्ण करावे. नक्कीच शासन प्रशिक्षणार्थींना न्याय देईल, असा आशावाद मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण संघटनेचे संस्थापक प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण राज्य संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील गंगणबीड येथील महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्रातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. बारावी पास, पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रूपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, पण विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. तसेच हे विद्यावेतन तुटपुंजे असल्याने प्रशिक्षणार्थींना हेळसांड होत आहे. नियमानुसार काम आणि वेळेवर द्यावे. ही प्रशिक्षणार्थींची मागणी न्याय्य असून सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून ती मागणी पूर्ण करावी.

सहा महिन्यानंतर आम्हाला काय भवितव्य आहे, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोपाळे म्हणाले की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आमचे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच कायम (पर्मनंट) होतील, असे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील. 9 जुलै 2024 च्या जीआरमध्ये या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग, आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छूकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापना यांना आदेशित करून आस्थापना पगार देणार नसेल तर शासनाने त्यांचा पगार देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी शासनाला केली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या संदर्भात सकारात्मक आहेत.. त्यामुळे युवकांनी निराश होऊ नये. लवकर मिनी मंत्रालय समजल्या जाणा-,या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत.. महायुतीने विधानसभेवर झेंडा फडकवला आणि त्यांना महाराष्ट्रातील मिनी मंत्रालयावरदेखील त्यांना झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे ते नक्कीच लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणांना नाराज करणार नाहीत… त्यामुळे शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा वाटते असे प्रतिपादन प्रोफेसर हनुमंत भोपाळे यांनी केले… यावेळी भोपाळे यांनी युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सकारात्मक उत्तरे दिली..

यावेळी गंगाधर बालाजी शिंदे, वाघमारे हनुमंत मधुकर ,जाधव इंद्रजीत गोविंदराव, कांबळे राजेश शिवाजी, नरसीकर आकाश नंदकिशोर, पवार संतोष शंकर, दासरवाड गंगाधर शिवाजी, लुटके लक्ष्मण पंढरी, मंगेश बालाजीराव आनेमवाड, मिटके साईनाथ सुरेश,कोमल विठ्ठल शिंदे, भगवान संभाजी पांचाळ ,शिवप्रसाद आनंदराव मिर्झापुरे, सुरज कोंडीबा गलांडे, सचिन अनुरथ शेळके, भारती राजाबुवा शंकर, चिखले अवधूत शिवाजी, मुतखेडे विनोद शिवाजी, परडे राहुल बालाजी ,लव्हाळे नारायण उत्तमराव ,होळकर गजानन साहेबराव, कदम कृष्णा रावसाहेब, पांडे शिवराज दादाराव, जुने विठ्ठल रावसाहेब, वाघमारे केशवराव साहेब सूर्यवंशी कल्याण योगेश्वर संभाजीराव भोगे निखिल विश्वनाथ ,जगदीश गंगाधर भिलवंडे , कैलास गोविंदराव पांचाळ ,जगदीश बालाजी नरहरे, श्यामसुंदर लिंगुराम कर्वेडकर , गोरगे मनमत नागोराव, गजले जगदीश व्यंकटराव, बसवेश्वर शिवाजी महाजन, नरेश शंकराव अरगुलवार, शैलेश संभाजी स्वामी, अनिरुद्ध साहेबराव भदर्गे ,बोरगे शिवाजी गुलाबराव, मुर्के साहेबराव प्रभाकर, दासरवाड हनुमंत गंगाधर, बालाजी साहेबराव दुरे, प्रसाद उत्तमराव पांडे, सचिन बालाजी पगलवाड, सरस्वती लक्ष्मण गजलेकर, सुनील बालाजीराव हांडे, माधव देविदास खांडरे, धीरज गोविंद शिंदे, साबळे परमेश्वर रावसाहेब, कैलास दगडू शिरसे , रहमान सत्तार बिरबल, मोईन हैदराबाद शेख, दशरथ रंगराव पवार , योगेश्वर वसंतराव भालेराव , नितीन पिराजीराव महादळे, शिरसे अनिकेत आईनाथ, कदम अरुणा संतोष, जाधव राजेश्वर अशोक, कपिल रामराव गोंशेट्वाड, बारदेसंगम रमेशराव संतोष, भिवाजी तेलंग साईप्रसाद गंगाधरराव जळपतवार ,गणेश प्रभू पुरी, हैदर रहमान शेख, अनिता संतोष तेलंग, रोडे सुप्रिया राजाराम, पवार वैष्णवी माधवराव, सोनूताई धनराज कदम, मंगेश विलासराव देशमुख, अमित शिवकुमार भांगे, पिराजी पांडुरंग श्रीमलवार, श्रीकांत बाबना बहनवाड, तिरुपती व्यंकटराव डोईफोडे, मारुती संभाजी चेरकेवाड,मानसिंग संतोषसिंह तोर, प्रेमुलवाड शिवकुमार माधवराव, चक्रधर मुरलीधर पुयड, जयराम नामदेव गाडेकर, सचिन राजाराम दासरवाड, उंबरे रोहित सोपानराव, शिवदास हरिदास कुराडे, ज्ञानेश्वर गंगाधर तोडे, संतोष सुधीर भिसे, साईनाथ चंद्रकांत जिंके, विजयकुमार नारायण अमृतवार, जयश्री विलास वाघमारे, श्रीनिवास नागनाथ करपे, रमेश अर्जुन कांबळे, यशवंत कांबळे, प्रदीप शिवराम राठोड, पांडुरंग बाबाराव राठोड, ज्ञानेश्वर नागोराव देगावे, गजानन केशव सूर्यवंशी, जाधव हनुमंत गोविंदराव, कापसे व्यंकट आनंदराव, गायकवाड प्रसाद चांदू, हेमलवाड गंगाप्रसाद, सय्यद जबार पीरसाब, जोंधळे प्रदीप अशोकराव, साईनाथ गंगाधर चंदनकर, परमेश्वर साहेबराव कांबळे, संदीप मारुती मस्के आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर घंटेवाड, बालाजी मंडलापुरे, परमेश्वर कांबळे, ज्ञानेश्वर तोडे, प्रसाद पांडे, प्रदीप जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न