भुसावळच्या प्रौढास चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळच्या प्रौढास चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ शहरातील नारायण कॉम्प्लेक्सजवळ ५५ वर्षीय प्रौढास तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक संशयित फरार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित जय मनोज जाधव (२४), रवी देवसिंग कसोटे (२४) दोन्ही रा. वाल्मीक नगर, भुसावळ यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सुनील यशवंत पाटील (५५) रा. जुना सातारा मरीमाता मंदिरामागे राहतात. दोन डिसेंबरला १० वाजेच्या सुमारास नारायण नगर कॉम्प्लेक्स जवळून जात असताना तिघांनी त्यांना थांबविले. संशयित जय मनोज जाधव याने चाकू दाखविला तर रवी कसोटे याने हात धरले. तिसरा फरार संशयिताने त्यांच्या खिशातून ४५ हजार रोख व १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकाविला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक इकबाल इब्राहिम अली सय्यद करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.