परभणी दगडफेक प्रकरण; सोमनाथ सुर्यवंशींचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.

संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये झालेल्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान शहरात दगडफेक जाळपोळच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली आहे. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न्यायालयाच्या निगराणीत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आलं आहे.

संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये झालेल्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहलावात एक धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे. ती म्हणजे बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. घाटी रुग्णालयाचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. दरम्यान, प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस अधिकृत ट्विटर हँडलवर देखील त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. ”सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच! शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण उघड. परभणी : परभणी येथे आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे. संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले. यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता. त्यांचा रविवारी (दि.15) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर परभणी शहरात दाखल झाले आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली होती. तसेच सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.