महिलेला पोलिसांकडून बेदम मारहाण! मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल

परभणीत बंद दरम्यान झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर करण्यात आलेल्या लाठी चार्ज दरम्यान एका महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण केल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल परभणीत 10 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात बंद पाण्यात आला. बंद दरम्यान दुपारी 12 नंतर शहरातील बाजारपेठेमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धरपकड आणि लाठीचार्ज केला. या कारवाई दरम्यान बऱ्याच महिलांना पोलिसांनी अटक करत मारहाण केल्याचे आता सीसीटीव्हीतील व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.

11 डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान वसमत रोडवरील सावली विश्रामगृहासमोर असलेल्या ग्राउंड मध्ये, आंदोलकांना पोलिसांकडून धरपकड आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ 50 वर्षीय वत्सला मानवते या आपल्या मोबाईल मध्ये बनवत होत्या. मोबाईल मध्ये चित्रीकरण का करत आहेस असे म्हणत पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांचा मोबाईल हस्तगत करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता वत्सला मानवते यांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री अडीच वाजेपर्यंत त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणी मध्ये त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रात्री अडीच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सर्वच शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. “आंदोलनामध्ये मी सहभागी झाले नव्हते मी मोर्चामध्ये देखील नव्हते फक्त माझा गुन्हा एवढाच होता की माझ्यासमोर मारहाण होत होती आणि मी त्याचे माझ्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करत होते. मी एका दवाखान्यामध्ये सिस्टर म्हणून काम करत आहे माझा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता मी पोलिसांना ही सर्व गोष्ट सांगत होते पण पोलिसांनी काहीच ऐकले नाही व मला जबर मारहाण केली. त्यामुळे मला न्याय मिळावा यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. मानवाधिकार आयोगाकडे माझ्या नातेवाईक नातेवाईकांनी तक्रार केली असून मला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही” असे वत्सला मानवते म्हणाल्या. हा सबंध प्रकार आम्ही प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे व नांदेड परिक्षेत्राचे आईजी शहाजी उमप यांच्या समोर मांडला पण या दोघांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रघुनाथ गावडे यांनी मात्र संबंधित प्रकाराची दखल घेतली असून जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल असे डॉक्टर सिद्धार्थ हत्तीआंबिरे प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सुजात आंबेडकर यांनी या महिलेची भेट घेवून पाहणी केलीय तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह परभणी आणि राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.