बेपत्ता पतीचा दोन वर्षांनी फोन, पत्नी गेली भेटायला, खोलीचे दार उघडताच बसला धक्का

एका महिलेला तिच्या बेपत्ता पतीचा दोन वर्षांनी फोन आला. भेटीसाठी बोलावल्यावर तिला धक्काच बसला. पती सात जणांसह त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता. या सर्वांनी मिळून महिलेला बेदम मारहाण केली. शेजारी धावून आल्याने तिचा जीव वाचला. महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक धक्कादायक घटना पुढे आलीये. दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा अचानक पत्नीला फोन आला. त्यानंतर पती पत्नीला एका ठिकाणी भेटण्यास बोलावतो. मात्र, ज्यावेळी पत्नी तिथे पोहोचते तिला मोठा धक्काच बसतो. पत्नीने दरवाजा उघडताच रूममध्ये सात जण उपस्थित होते. यावेळी तिथे एक मुलगी देखील होती. पत्नीने पतीला विचारले की, ही कोण?. पती म्हणतो की, ही माझी गर्लफ्रेंड आहे. त्यानंतर हे सात जण मिळून पत्नीला मारहाण करतात. ही मारहाण इतकी जास्त भयानक होते की, तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अनेक गंभीर वार करण्यात आले.

सात जणांनी मिळून लोखंडी रॉडने देखील मारहाण केली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी तिच्या मदतीला धावले. महिलेची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर महिलेने थेट पोलिस ठाणेच गाठले. महिलेने पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच सात जणांवर गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी तपास हा केला जातोय. हैराण करणारे म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. महिलेचा पती चोपण पोलीस स्टेशन हद्दीतील डाळा येथे ऑर्केस्ट्रा डान्सरच्या प्रेमात पडला होता. यानंतर पती आणि त्याच्या प्रेयसीच्या डान्सरच्या कुटुंबियांनी मिळून पत्नीला मारहाण केली. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. मारहाणीमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक लोकांच्या मदतीने त्या महिलेला वाचवण्यात यश मिळाले. महिलेने या घटनेनंतर पोलिसांना मोठी माहिती दिली.महिला म्हणाली की, पतीच्या गर्लफ्रेंडबद्दल मला काहीही माहिती नव्हती. दोन वर्षांपूर्वी त्याने अचानक घर सोडले होते. त्यानंतर त्याने रविवारी फोन केला. दोन वर्षाने पतीचा फोन आला त्यामुळे मी आनंदात होते आणि त्याने सांगितले तिथे भेटण्यासही गेले. मी तिथे जाताच मला मारहाण करण्यास सुरूवात केली. बाकी मला काही देणेघेण नाही. त्याच्यावर सहा लाखांचे कर्ज आहे, ते त्याने फेडावे. बाकी त्याला कोणासोबत राहायचे त्याने राहवे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.