चंद्रपुरातील आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श चिवंडे हे पोलीस भरतीसाठी सराव करण्यास प्रशिक्षण केंद्र चालवतात. पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या दोघांवर काळाने झडप घातली. पैनगंगा नदी पात्रात युवक-युवतीचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या भोयगाव येथे घडली. संध्या शिंदे (वय २०) आणि युगल नागपुरे (वय १९) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.










