आंतर राज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद, 11 म्हैशीसह एकूण 16 लाख रु कि चा मुद्देमाल हस्तगत

आंतर राज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद, 11 म्हैशीसह एकूण 16 लाख रु कि चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर

निभोरा पोलीस स्टेशन ता. रावेर जि. जळगाव येथे दिनांक 24.04.2024 रोजी गू.र.न 69/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे व दिनांक 10.06.2024 रोजी गु.र.न 108/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही गुन्ह्यातील एकुण 5 म्हैशी कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेले बाबतच्या तक्रारीवरुन गुन्हे तपासावर घेण्यात आले होते. सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेणे बाबत व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक सो श्री महेश्वर रेड्डी सर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सर, मा. सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह मेंडम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. मा. वरीष्ठांच्या आदेशानुसार निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मा. सपोनि हरीदास बोचरे व तपासी अंमलदार पोहेका / ज्ञानेश्वर चौधरी, पोना/अविनाश पाटील हे गुन्हाचा तपास योग्यरित्या करीत होते.


दाखल गुन्हात सपोनि बोचरे यांनी केलेल्या तांत्रिक तपास व अमंलदार यांच्या मदतीने 60 पेक्षा अधिक सि.सि.टी.व्ही कॅमे-यांची पडताळणी केली असता सदरील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच आरोपीतांपैकी आरोपी नामे ।) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा. बोरी जि.ब-हाणपुर हा न्हावी, फैजपुर ता यावल येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती सपोनि हरिदास बोचरे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच फैजपुर पो स्टे चे सपोनि / निलेश वाघ यांना सदरची माहीती देवून त्यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले होते. आरोपी तुकाराम याच्याकडे तपास केले असता इतर आरोपी मध्य प्रदेश राज्यात असले बाबत समजल्याने मा. पोलीस अधिक्षक सो यांच्या आदेशाने मा. सपोनि हरिदास बोचरे, पोहेकों/जाकीर पिंजारी, चापोहेकॉ योगेश चौधरी, पोना/सुरेश पवार व पोकों/मयुर निकम व रावेर पो स्टे चे पोहेकों/ईश्वर चव्हाण, पोकों/सचिन घुगे असे शोध पथक मध्यप्रदेश राज्यात जावुन आरोपी नामे 2) धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.डेरीया जि. खंडवा, 3) शांताराम बिल्लरसिंह बारेला. रा. हिवरा जि. ब-हाणपुर, 4) सुभाष प्रताप निंगवाल, रा. दहिनाला जि.ब-हाणपुर.5) मस्तरीराम काशीराम बारेला. रा. न्हावी ता. रावेर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन 11 म्हेशी, 2 बोलेरो पिकअप व 2 मोटार सायकल असे एकुण 16,00,000/- रु कि चे मुद्देमाल हस्तगत केले असून त्यांची गुन्हाच्या अनषंगाने चौकशी केली असता त्यांनी निंभोरा पो स्टे येथील गु.र.न 69/2024, गु.र.न 108/2024, फैजपुर पो स्टे गु.र.न 97/2024, गु.र.न 137/2024, गु.र.न 151/2024 मुक्ताईनगर पो स्टे गु.र.न 05/2024, गु.र.न 57/2024, रावेर पो स्टे गु.र.न 298/2024, सिल्लोड ग्रामीण पो स्टे (जि. छत्रपती संभाजीनगर) गु.र.न 165/2024 व पंधाना पो स्टे गु.र.न 122/2024 (जि. खंडवा, राज्य मध्यप्रदेश) अशा ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.


यातील आरोपी क्र.2) धर्मेद्र दुरसिंग बारेला, रा. डेरीया जि. खंडवा यावर विविध कायदे व कलमान्वये 14 गुन्हे मध्यप्रदेश राज्यात दाखल असुन तो पंधाना पोलीस स्टेशनचा जि. खंडवा येथील हिस्ट्रीशीटर आहे व मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपुर, खंडवा, खरगोन, हरदा या 4 जिल्हातून तडीपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही निभोरा पो स्टे प्रभारी अधिकारी मा. सपोनि हरीदास बोचरे, श्रेपोउपनि राजेंद्र पाटील,सफी/ ज्ञानेश्वर पाटील, चासफौ/अशरफ शेख, पोहेका/स्वप्निल पाटील, पोना/सुरेश अढायगे, पोना/सुरेश पवार, पोकाँ/मयुर निकम, पोकों/किरण जाधव व पोकों/अमोल वाघ फैजपर पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि निलेश वाघ, सफौ/विजय चौधरी, सफी/देविदास सुरदास, पोहेकों/राजेश ब-हाटे, पोहेकॉ महेंद्र महाजन, रावेर पो स्टे पोहेकों/ईश्वर चव्हाण, पोकों/सचिन घुगे, स्था.गु. शाखा जळगाव येथील पोना/ईश्वर पाटील, पोकों/मिलींद जाधव, पोकों/गौरव पाटील या तांत्रिक विश्लेषण पथकाने सि.सि.टी. व्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करुन एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.