ड्रग्ज प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका; कारवाई करण्याचे दिले आदेश

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनामध्ये वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला असून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये बजेटवरुन मोठी खडाजंगी झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये विरोधकांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत विरोधकांना खडेबोल सुनावले. सभागृहातील चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ड्रग्ज माफियांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच या ड्रग्जमुळे तरुणाई बदबार होऊ देणार नाही अशी भूमिका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ड्रग्स विक्रेत्यांना बिलकुल सोडणार नाही

पुणे शहरातील वाढत्या ड्रग्ज प्रकरण व अनाधिकृत पब यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये सर्रास दारु व ड्रग्ज उपलब्ध होत असल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावर लक्षवेधी सादर केली आहे. सभागृहातील चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी विधीमंडळाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, ड्रग्स ठेवणाऱ्यांवर व ड्रग्स विकणाऱ्यांवर तसेच ज्या हॉटेलमध्ये ड्रग्स ठेवले जातात अशा सर्व ठिकाणांवर कारवाई केली जात आहे. तसेच फक्त पुणे नाही तर ठाणे, मुंबई, नाशिक सर्व जिल्ह्यात जिथे जिथे ड्रग्स विक्री होत असेल तिथे कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरु असेल. तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम करतात त्या लोकांवर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरू केली आहे. शाळा, कॉलेजच्या आजूबाजूला ड्रग्स जे विकत असतील एखाद्या हॉटेलमध्ये ड्रग्स विकत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही. आम्ही तरुण पिढी बरबाद होऊ देणार नाही. ती आमची देखील मुलं आहेत. असं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांचा हात राख्यांनी भरला

तसेच विधीमंडळाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक महिलांनी राख्या बांधल्या. मुख्यमंत्री शिंदे यांचे संपूर्ण मनगट राख्यांनी भरले होते. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी बहिण योजना जाहीर केल्यामुळे महिलांनी या राख्या बांधल्या. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकारकडून महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. यानंतर त्यांच्या खात्यांमध्ये दीड हजार रुपये दाखल करण्यात येणार आहे. तसेच गॅसच्या किंमतीची त्यांना सातत्याने चिंता असल्यामुळे तीन गॅस सरकारकडून मोफत दिले जाणार आहे. राज्यातील महिला भगिनींसाठी ही राज्य सरकारने ऐतिहासिक योजना आणली. ही योजना 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असून त्याचा जीआर देखील आपल्या सरकारने काढला आहे. यामुळे महिला भगिनींनी राख्या बांधल्या. मात्र या योजनेची विरोधकांनी हेटाळणी केली. विरोधीपक्ष नेत्यांनी यावर शंका उपस्थित केली. मात्र माझ्या अडीच कोटींहून अधिक महिला भगिनींना न्याय मिळणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.Dailyhunt

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.