अवैध गॅस सेंटरचा पर्दाफाश, ३५ सिलेंडर जप्त

अवैध गॅस सेंटरचा पर्दाफाश, ३५ सिलेंडर जप्त

जळगाव : शहरातील इच्छा देवी या ठिकाणी अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. या कारणामुळे एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची बदली झालेली होती. खांदे पालट होताच नवीन अधिकाऱ्यांनी अवैध गॅस सेंटरचा पर्दाफाश करीत ३५ गॅस सिलेंडर जप्त केले व आरोपीला अटक केली.यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील इच्छा देवी ज्या ठिकाणी गाडीमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. चार जण जखमी झालेले आहेत. अवैध गॅस भरणा केंद्र मोठ्या प्रमाणात एमआयडीसी परिसरात सुरू असल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली.

त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना पदभार मिळताच त्यांनी सहकार्यांना घेऊन फातिमानगर येथील शोएब शेख शफी या अवैध गॅस सेंटर चालवणाऱ्याच्या गॅस सेंटरवर कारवाई करत ३५ गॅस सिलेंडर एक गॅस भरणे करण्याची मशीन व त्या व्यक्तीला ताब्यात घेतले यावेळी वीस घरगुती व १५ कमर्शियल गॅसच्या हंड्या जप्त केल्या आहेत याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते यांनी केली आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.