जळगावकरांना भरली हुडहुडी, पारा घसरला ; थंडीचा जोर आणखी वाढणार

जळगावकरांना भरली हुडहुडी, पारा घसरला ; थंडीचा जोर आणखी वाढणार

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच रात्रीच्या तापमानाचा पारा प्रचंड घसरला. जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीचे तापमान दहा अंशापर्यंत खाली घसरले होते.त्यामुळे जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. येत्या चार ते पाच दिवसात पारा अजून कमी होवून रात्रीचे तापमान सात अंशापर्यंत कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

कमी होणाऱ्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होत असला तरी देखील फळबागांचे काही प्रमाणात नुकसान या अतिथंडीमुळे होणार असल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. अतिथंडीचा सर्वांधिक फटका केळीला बसत आहे. केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्याचे चित्र आहे. तसेच थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करत आहेत. सकाळी 8 पर्यंत धुक्याची चादर थंडीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात सकाळी धुक्याची चादर परलेली होती. सकाळी ८ वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. जळगाव जिल्ह्यातनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट झाल्यानंतर, पुन्हा दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली होती. शुक्रवारी (दि. 13) रात्री जिल्ह्यात रात्रीच्या तापमानाचा पारा प्रचंड घसरल्याने जळगावकरांना मात्र हुडहुडी भरली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.