जखमी महिला पोलीस कर्मचारीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले. प्रथम उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रिव्हॉल्वरची गोळी लागल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना पेण तालुक्यातील दादर येथे घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्थानकात सरकारी शस्त्रे तपासणी व सफाईचे काम सुरू होते. त्यानुसार येथील पोलीस अधिकारी हे आपले सरकारी शस्त्र रिव्हॉल्वर साफ करीत होते. अचानक रिव्हॉल्वरमधून गोळी सुटुन जवळच असलेली महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड यांना लागली. सदर गोळी त्यांच्या पायाला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.










