अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त
जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्हयातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे.

या तपासणीत आस्थापनांच्या उलाढालीनुसार परवाना-नोंदणी केली आहे का?, कामगारांचे वैदयकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का? , सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाहय कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे. याशिवाय बेक-यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत्‍ गोपनीय माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, यांचे पथकाने बुधवार 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जळगावातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणी मध्ये साठा करुन ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा 2792 किग्रॅ वजनाचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख्‍ तसेच बिलाचा उल्लेख नव्हता. ही कारवाई ही अन्न्‍ सुरक्षा अधिकारी  .कि. आ. साळुंके व त्यांचे सहकारी अन्न्‍ सुरक्षा अधिकारी  के.एच.बाविस्कर,   श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कृ.कांबळे व मा. सह आयुक्त, म.ना.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. जळगाव जिल्हयात अन्न्‍ व औषध प्रशासनाच्या वतीने ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तपासण्या करण्यात येणार असून स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ न तयार करणाऱ्या पेढयांविरुदध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.