कंपनीतील वायुगळतीचा नागरीकांना त्रास;कंपनीला MPCB ची क्लोजर नोटीस,पोलिसांकडून गुन्हा दाखल

रात्री झालेल्या गॅस गळती प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टीनको केमिकल्स या कंपनीला क्लोजर नोटीस बजावली असून बदलापूर पूर्व पोलिसांनी या कंपनी विरोधात सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. दलापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतून नायट्रोजन डायऑक्साइड वायुची गळती झाली. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास जाणवू लागल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सदर वायु गळतीची कोणतीही माहिती कंपनीने प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिली नाही त्यामुळे कंपनी विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

बुधवारी रात्री अचानक संपूर्ण बदलापूर शहरात नायट्रोजन डायऑक्साइड पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. हवेचा गुणवत्ता निर्देशांक या काळात ३१४ पर्यंत पोहोचला होता. तर नायट्रोजन डायऑक्साइड वायूचा निर्देशांक एका तासात ३२५ पर्यंत पोहोचला होता. मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन डायऑक्साइड हवेत पसरल्याने हजारो नागरिकांना त्रास जाणवला. दरम्यान, परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रात्री झालेल्या गॅस गळती प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टीनको केमिकल्स या कंपनीला क्लोजर नोटीस बजावली असून बदलापूर पूर्व पोलिसांनी या कंपनी विरोधात सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. टीनको कंपनीत बुधवारी रात्री पोटॅशिअम कार्बोनेट आणि पोटॅशिअम क्लोराईडचं नायट्रिक ऍसिड सोबत मिश्रण करण्याची प्रक्रिया सुरू असताना रिऍक्टरमध्ये गॅस तयार झाला. यावेळी कुलिंग आणि स्क्रबिंग सिस्टीम निकामी झाल्यानं नायट्रोजन डायऑक्साईड वायू हवेत पसरला. यामुळे बदलापूर शहरात नागरिकांना त्रास झाला, मात्र कंपनीने याची कोणतीही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नाही, असा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपनीवर ठेवलाय. तसंच पुढील आदेश मिळेपर्यंत कंपनीने कोणत्याही प्रकारचं उत्पादन करू नये, अशा आशयाची क्लोजर नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉ. राजू राजपूत यांनी टीनको कंपनीला बजावली आहे. तर दुसरीकडे या कंपनीविरोधात बदलापूर पूर्व पोलिसांनीही सुमोटो गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी नित्यानंद बोरा आणि प्रशांत शाहू अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बालवडकर यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.