गोविंद शेतात आंब्याच्या झाडाला… एक फोन अन् भावाच्या पायाखालची जमीनच सरकली, कुटुंबाचा आक्रोश.

बुलढाण्यात एका तरुणाने शेतात जाऊन झाडाला गळफास घेत आपील जीवन यात्रां संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात जात आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. हा तरुण, स्वतःच्या शेतात गेला फेरफटका मारायला आणि तेथे त्यांने आत्महत्या केली. त्याने आंब्याच्या झाडाला गफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
 बुलढाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथील तरुण गोविंद सुरेश गायकवाड (वय वर्ष २६) हा बाभुळगाव शिवारांमधील त्याच्या शेताला लागून असलेले आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचं आढळून आला. मंगळलाकी (१० डिसेंबरला) सकाळी दहा वाजता उघडकीस आल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच खळबळ माजली.

शेतकरी संतोष छगन वाकडे हा सकाळी शेतामध्ये फेरफटका मारायला गेला होता. फेरफटका मारत असताना त्याला एका आंब्याच्या झाडाला गोविंद गायकवाड हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे पाहताच संतोष छगन वाकडे यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ मंगळूर येथील दीपक तांबट यांना फोन लावला आणि याबाबतची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. 
दीपक तांबट यांनी त्यांचा चुलत भाऊ दामोदर गजानन गायकवाड यांना फोन द्वारे कळविले की, आपल्या चुलत भावाने बाबुळगाव शिवारातील पंजाब गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. 
भावाने असा काहीतरी अनुचित प्रक्रार केल्याचं कळताच दामोदर यांच्या पायाखालची वाळू सरकली. गोविंदने असं अचानक का केलं हे त्यांना काही काळ समजू शकले नाही. याबाबत फिर्यादी दामोदर गजानन गायकवाड (वय वर्षे २१) यांनी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी अमडापूर पोलीस स्टेशनला मर्ग नंबर ४३ २२४ कलम १९४ नुसार दाखल केला. अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळ बीड जमदार एएसआय दिलीप तोंडे याबाबत पुढील तपास करीत आहे. मृतकाच्या पश्चात भाऊ, आई-वडील, भाऊजी असा परिवार असून या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.