घरफोडी करणाऱ्या दोघांना एक लाख २० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक, ‘सर्च ऑपरेशन’ मध्ये श्वानाची मदत.

डॉग हॅण्डलर पोहेकॉ. रोकडे व पाटील यांच्यासह विटाभट्टी येथील एक किलोमीटर अंतरावरील परिसरात धावत जाऊन संशयित आरोपी हर्षल चौधरी याच्या घराजवळ नेले. यावेळी घराची झडती घेतली असता काळ्या व पांढऱ्या रंगाचे मफलर मिळून आले. धुळे शहरातील प्रभात नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात देवपूर पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन, १ लाख २० हजार रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. राम निकम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि पितळी भांडी चोरून पोबारा केला होता, या प्रकरणी देवपुर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन संशयित तरुणांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता सदर चोरी त्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

देवपुरातील प्रभातनगर येथील रहिवासी राम मनोज निकम यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत कपाटामधील व घरातील सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह पितळी भांडी, रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी देवपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल गुन्ह्याच्या तपासाला गती देत शोधपथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यामध्ये दोन चोरटे हे राम निकम यांच्या घराजवळ उभे होते व त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा होता. त्यात एकाने तोंडाला काळ्या व पांढऱ्या रंगाचे मफलर गुंडाळले होते.

तो धागा पकडून कुत्रा पाळणारा सराईत आरोपी कोण आहे, याचा तपास पोलिस रेकॉर्डवरुन लावला असता. तो अट्टल गुन्हेगार हर्षल ऊर्फ सनी चौधरी (रा. विटाभट्टी देवपूर, धुळे) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. नंतर पोलिसांनी श्वान पथकातील जयला(श्वान), आरोपींनी घटनास्थळी हाताळलेल्या वस्तूंचा वास देण्यात आला. डॉग हॅण्डलर पोहेकॉ. रोकडे व पाटील यांच्यासह विटाभट्टी येथील एक किलोमीटर अंतरावरील परिसरात धावत जाऊन संशयित आरोपी हर्षल चौधरी याच्या घराजवळ नेले. यावेळी घराची झडती घेतली असता काळ्या व पांढऱ्या रंगाचे मफलर मिळून आले. पोलिसांनी सखोल विचारपूस केली असता, त्याने मित्र जयवंत बापू पाटील (रा. विटाभट्टी देवपूर, धुळे) सोबत चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी जयवंत पाटील यालाही अटक केली. दोघांकडून चोरी केलेला १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना अटक करुन दोघांविरुद्ध देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक निरीक्षक भटू पाटील, दीपक पावरा, उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, उपनिरीक्षक मसलुद्दीन शेख, पोकॉ. भटेंद्र पाटील, सौरभ कुटे, गुंजाळ, वसंत कोकणी, प्रवीण पाटील, नितीन चव्हाण, पोहेकॉ. कैलास पाटील, राजेंद्र हिवरकर, मपोहेकॉ. रजनी नाईक, मोहिनी माळी यांनी सदर गुन्ह्याची उकल केली आहे.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न