विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी मयत किशन खोसे यांच्या मुलाचा देखील अशाच प्रकारे खून करण्यात आला होता. प्रेम प्रकरणातून मयताच्या भाच्यानेच खून केला होता. त्या दिशेने देखील पोलिसांनी तपास सुरु केला. नांदेडमधील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका ६७ वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा पोलिसांनी उलघडा केला आहे. घटनेच्या सात दिवसानंतर पोलिसांनी गावातीलच मदन अंबादास हंबर्डे या युवकास अटक केली आहे. ”अनैतिक संबंधाचा संशय आणि पूर्व वैमनस्यातून कोणी तरी मला मारून टाकेल” या धास्तीने आरोपीने खून केल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे.










