कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आपल्या आईला गमावलेल्या आबिद शेख यांनी हा अपघात यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. तसेच, पैसे नकोत आरोपीवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. कुर्ला येथे घडलेल्या बेस्ट बस अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुर्ल्यातील एलबीएस रस्त्यावर ही भीषण घटना घडली. या अपघातात इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं, त्यात ४९ जण जखमी झालेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.










