बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध कारवाईची मागणी वकिल संघाचे तहसिलदारांना निवेदन भडगाव तालुका बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध कारवाईची विनंती’ केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आज अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही देशातील वकिलांची सर्वात मोठी संघटना आहे. जी राष्ट्र आणि समाजाला समोर ठेवून काम करते. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचला पाहिजे. या तत्त्वावर संघटना देशभरात कार्यरत आहे. सर्वांना मानवी हक्क प्रदान करणे हे संघटनेच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक आहे.
यास अनुसरून बांगलादेशात ही हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे अधिवक्ता परिषद अत्यंत व्यथित आहे. याबाबात आज अनेक मागण्या घेऊन भडगाव तालुका वकिल संघ व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांच्या वतीने तहसिलदार शितल सोलाट यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत भडगाव तालुका अध्यक्ष ॲड.निलेश तिवारी, भडगाव वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रकाश तिवारी, सचिव ॲड, गणेश वेलसे, उपाध्यक्ष ॲड. के. टी. पाटील, ॲड. विजय महाजन, ॲड. अशोक बाग, ॲड. मुकुंद पाटील, हेमंत कुलकर्णी, ॲड. सिद्धार्थ वानखेडे, ॲड. नितीन महाजन, ॲड. भरत ठाकरे, ॲड. पि. के जयस्वाल, ॲड. बी आर पाटील, ॲड. रोहित मिसर, ॲड. समाधान सोनवणे, ॲड.आर. के. वाणी, ॲड. किशोर पाटील, ॲड. बी. टी. अहिरे, ॲड. प्रकाश सोनावणे, ॲड. विनोद महाजन, ॲड. रणजीत पाटील, ॲड. आर बी ब्राह्मणे, ॲड. जे. डी. काटकर, ॲड. सुनील पाटील, ॲड. डी. आर. पाटील, मदन मोरे, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.