बाबांची रिव्हॉल्व्हर अन् धाड, धाड, धाड; मित्रांना मेसेज करुन दहावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं.

एका दहव्या वर्गातील विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आपल्याच वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडत एका मुलाने आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या १० व्या वर्गातील अल्पवयीन मुलाने रविवारी आपल्या वडिलांच्या लायसन्स रिव्हॉल्व्हरन स्वत:वर गोळी झाडली. बिहारच्या भागलपूरमध्ये ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरुन रिव्हॉल्व्हर आणि अल्पवयीन मुलाचा मोबाईल फोन जप्त केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कहलगाव पोलीस ठाण्याचे एसएचओ देव गुरु यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यानुसार, रविवारी (८ डिसेंबर) १० व्या वर्गातील या अल्पवयीन मुलाने आपल्या घरात वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून आपला जीव दिला. या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने असं का केलं याचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, त्याच्या कुटुंबाच्या मते तो त्यांच्या सहामाही परीक्षेत मिळालेल्या गुणांपासून समाधानी नव्हता. कहलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आनंद विहार कॉलनीत आपल्या राहत्या घरीच या अल्पवयीन मुलाने आपली जीवनयात्रा संपवली. एसएचओ देव गुरु यांनी सांगितलं की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ज्या बंदुकीने त्याने आत्महत्या केली ती बंदुकही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच, त्याचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याच्या मोबाईलचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासानुसार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, या अल्पवयीन मुलाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तसेच, त्याने आयुष्याची दोन नेहमीकरता कापण्यापूर्वी आपल्या मित्रांना काही मेसेज पाठवले होते. मी जीव देतोय, असा मेसेज त्याने आपल्या मित्रांना केला होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सहामाही परीक्षेत जे गुण मिळाले होते त्याने तो आनंदी नव्हता. त्याला तीन विषयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले होते. सध्या या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु असून त्याने कमी गुण मिळाल्याने हे पाऊल उचललं की यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.