डिसेंबर सुरू झाल्यावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. ‘टिस’ विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट्स फोरम या संघटनेने शिक्षकांच्या संघटनेला आणि प्रशासनाला ई-मेल पाठवत या शिक्षकांना कायम ठेवण्याची विनंती केली होती. याबाबत ‘टीआयएसएस’ प्रशासनाने खुलासा करत संस्थेने एक समिती स्थापन केली असून ती संस्थेत शाश्वत शिक्षण कसे देता येईल, यावर काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टिस) मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी या चार कॅम्पसवरील ११५ निलंबित कर्मचाऱ्यांना आणखी एक ते दोन महिने दिलासा मिळाला आहे. टाटा एज्युकेशन ट्रस्टने या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी केलेली तरतूद ३१ डिसेंबरपर्यंतच लागू होती. त्यामुळे त्यांचे पुढे काय होणार, हा प्रश्न अधांतरी होता. त्यावर प्रशासनाने आणखी एक ते दोन महिने पुरेल एवढा निधी असल्याचे सांगितल्याने या कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून (TATA Education trust) मिळणाऱ्या निधीतून पगार भागत असलेल्या ५५ शिक्षक आणि ६० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर जुलैमध्ये कुऱ्हाड पडली होती. त्यानंतर ‘टीआयएसएस’मधील शिक्षकांच्या संस्थेसह विद्यार्थी संघटनांनीही या कर्मचाऱ्यांना निलंबित करू नये, यासाठी आग्रह धरला होता. ‘टिस’च्या शिक्षक संघटनेने जुलै महिन्यातच प्रशासनाला पत्र पाठवत या निलंबित कर्मचाऱ्यांची बाजू घेतली होती. हे शिक्षक विविध कॅम्पसवर पूर्ण वेळ जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अनेक जणांचे संशोधनही सुरू आहे. ‘टिस’च्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना असे निलंबित करणे योग्य नसल्याची भूमिका संघटनेने मांडली होती. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत टाटा एज्युकेशन ट्रस्टनेही ३१ डिसेंबरपर्यंत या कर्मचाऱ्यांसाठी निधी दिल्याचे आश्वासन दिल्यावर या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले डिसेंबर सुरू झाल्यावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. ‘टिस’ विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट्स फोरम या संघटनेने शिक्षकांच्या संघटनेला आणि प्रशासनाला ई-मेल पाठवत या शिक्षकांना कायम ठेवण्याची विनंती केली होती. याबाबत ‘टीआयएसएस’ प्रशासनाने (Tata Institute of Social Sciences administration) खुलासा करत संस्थेने एक समिती स्थापन केली असून ती संस्थेत शाश्वत शिक्षण कसे देता येईल, यावर काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या शाश्वत शिक्षण देण्याच्या नव्या पद्धतींमध्येच आम्ही या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही प्रशासनाने म्हटले आहे. होते.