चोपडा तालुक्यातील गोरगावले व कोळंबा येथील गुळ व तापी नदीपात्रातुन अवैध रीतीने वाळू वाहतूक होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या त्या वाढत्या तक्रारीला आळा बसावा म्हणुन तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर दि. ७/१२/२४ रोजी सकाळी १०:५५ वाजता चोपडा ते जुना माचलारस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या महसूल विभागानचे पथकाने कार्यवाही केली असुन चालक सुरेश सिताराम भिलाला हे ट्रॅक्टर मालक अकिल सत्तार पिंजारी यांचे ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CV 3436 मधुन अवैधरित्या वाळू वाहतूक करतांना आढळून आले आहे.
सदर वाहन पोलिस स्टेशन हे जमा करुन घेत नसल्याने ते नविन तहसिल कार्यालय / प्रशासकीय इमारत, ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ, चोपडा. येथे जमा करण्यात आले आहे. अवैध गौण खनिज वाहतूक कार्यवाही करतेवेळी पथकामध्ये मंडळ अधिकारी – सुनिल कोळी, अजय पावरा, रविंद्र बेलदार, मनोज साळुंखे
ग्राम महसूल अधिकारी – संतोष कोळी, नितिन मनोरे, पंकज बाविस्कर, अमोल सोनवणे, प्रदिप नायदे, अनंत माळी. यांचा समावेश होता.