सोमवारी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्ल्यू बेरी समोर थांबले असता, त्यांना जबरदस्ती चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीत बसवत त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. पुण्यातून एक मोठी घटना समोर येत आहे. भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. सतीश वाघ असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.आज, सोमवारी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्ल्यू बेरी समोर थांबले असता, त्यांना जबरदस्ती चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीत बसवत त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे.या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपहरण करणारे चौघे जण असल्याचं समजत आहे. परंतु कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.










