भरदुपारी रस्त्यात गाठलं, कमरेचा चाकू काढला अन् काही कळायच्या आत..

कल्याणमध्ये पुन्हा एकदा भयंकर घटना घडली आहे. येथे एका तरुणाला भररस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आलं आहे.कल्याणमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाला रस्त्यात गाठून त्याच्यावर वार केले आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात दहशत माजली आहे. तर, घटनेनंतर परिसरातील लोकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 
कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बैलबाजार चौकात एका तरूणाला गाठून त्याच्यावर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून अरूण तिवारी याने दिलीप चौधरी नावाच्या तरुणावर हल्ला चढविला. एकीकडे घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी हल्लेखोरापासून या तरूणाला वाचविले. तर दुसरीकडे लोकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेची माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चाकू हल्ला करणाऱ्या अरूण तिवारी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी अरूण तिवारी आणि जखमी झालेल्या दिलीप चौधरी याच्याकडून अधिक माहिती जाणून घेत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. बैलबाजार चौकात शनिवारी दुपारच्या सुमारास दिलीप चौधरी हा काही कामानिमित्त आला होता. त्याच्या मागावर अरूण तिवारी कमरेला चाकू लावून आला. काही कळण्याच्या आतच त्याने कमरेला खोचलेला चाकू बाहेर काढून दिलीपवर हल्ला चढविला. चाकूचे वार पोटावर केल्याने दिलीप रक्तबंबाळ झाला. हा प्रकार पाहून चौकातील काही लोकांनी हल्लेखोर अरूण तिवारी याला पकडले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या हवाली केले. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान काहींनी दिलीपला उचलून केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये हलविले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे जखमी दिलीप चौधरी याचे प्राण वाचले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला? याचा चौकस तपास ताब्यात घेतलेला हल्लेखोर अरूण तिवारी याच्याकडून करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.