चालत्या बाईकला मागून धडक, दुचाकी थेट पुलावरुन खाली.

घटनेनंतर धडक दिलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  सतत होणाऱ्या अपघाताची चिंता व्यक्त केली जात असतानाच चंद्रपूर शहरात घडलेल्या अपघाताने जिल्हा हादरला आहे. नव्याने वाहतुकीसाठी खुला झालेला बाबूपेठ उड्डाण पुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकी थेट पुलावरुन खाली कोसळली. या अपघातात दोन तरुणांचा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. आर्यन विठ्ठल मेश्राम (वय १७, रा. माजरी, ता. भद्रावती) आणि रवी ऊर्फ साहिल संजय ढवस (वय २१) असे मृतकांची नाव आहेत. सुयोग सुरेश डांगे (चिमूर) हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आर्यन, साहिल, सुयोग हे तिघे मित्र दुचाकीने शहराचा दिशेने निघाले होते. नव्याने निर्मिती झालेल्या बाबूपेठ पुलावरून शहराच्या दिशेने येत असताना त्याच दरम्यान त्यांच्या दुचाकीला मागून वाहनाने धडक जोरदार दिली. या धडकेने तिन्ही मित्र दुचाकीवरून थेट पुलावरुव खाली कोसलळे. या घटनेत दुचाकीचालक आर्यन मेश्राम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रवी ऊर्फ साहिल संजय ढवस याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात तिसरा मित्र सुयोग सुरेश डांगे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर धडक दिलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या नवीन पुलावरचा हा पहिलाच अपघात आहे. या पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.