महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची धानोरा ता. चोपडा येथे बैठक संपन्न झाली महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची महत्वाची बैठक धानोरा ता.चोपडा येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांनी केले, शेतकऱ्यांनी शेती सोबत जोडव्यवसाय कडे लक्ष द्यावे जेणेकरून नैसर्गिक आपत्तीत ज्या वेळेस उद्भवल्यास या जोडव्यवसायातुन मिळण्याऱ्या मोबदल्यात आपल्या परिवाराच्या आर्थिक गरजा पुर्ण होऊ शकतात असे आवाहन केले.

शेतकऱ्यांना उदभवण्याऱ्या समस्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध रहावे, शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
लवकरच जळगाव जिल्ह्यात पक्षाचे अधिकृत कार्यालय सुरू करण्यात येईल आणि या कार्यालयात शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळेल, त्या सोबत पाठपुरावा करून त्या मिळवून देण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी सज्ज झाले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघातील अमोल पाटील जिल्हा सचिव रावेर लोकसभा,दिपक पाटील जिल्हा संघटक रावेर लोकसभा, वसीम तडवी उपजिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा,शुभम पाटील चोपडा तालुका अध्यक्ष,रहिम शेख चोपडा तालुका उपाध्यक्ष, गणेश गुजर चोपडा तालुका संघटक, विनोद पाटील मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष इत्यादी नियुक्त्या राज्य सचिव अमोल भिसे,अविनाश पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांच्या हस्ते करण्यात आल्या.
या बैठकीला राजेंद्र निकम जिल्हा संघटक जनहित कक्ष, कल्पेश पवार जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना रावेर लोकसभा, संदिप मांडोळे, श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, प्रदिप पाटील,विलास सोनार, बापू महाजन, मनोज लोहार, हर्षल वाणी, चैतन्य पाटील, विरेंद्र बोरसे, रोहित महाजन इत्यादी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.









