किरकोळ कारणावरून तरूण शेतकऱ्याला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून तरूण शेतकऱ्याला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील कानळदा गावात रस्त्यामध्ये पडलेले बांधकामाचे साहित्य बाजूला करण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका तरुण शेतकऱ्याला गावातील दोन जणांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, कुंदन अरुण राणे वय-३६, राहणार कानळदा ता. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले होते. ते साहित्य बाजूला करा असे सांगितल्याच्या कारणावरून गावात राहणारे रवींद्र सुरेश शिंदे आणि राहुल सुरेश शिंदे यांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. दरम्यान, या घटनेबाबत कुंदन राणे यांनी जळगाव तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुपारी ३ वाजता संशयित आरोपी रवींद्र सुरेश शिंदे आणि राहुल सुरेश शिंदे या दोघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील करत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.