चोरीच्या ११ दुचाकींसह चोरट्याला अटक; जळगाव पोलीसांची कारवाई

चोरीच्या ११ दुचाकींसह चोरट्याला अटक; जळगाव पोलीसांची कारवाई

यावल तालुक्यातील दहिगाव येथील राहणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाने तब्बल ११ दुचाकींपेक्षा जास्त जळगाव शहरासह ग्रामीण भागातून चोरी करून सावखेडा सिम दहिगाव भागात कमी दरात विक्री केल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी त्यास अटक केली आहे.पोलिसांनी संशयीतास ताब्यात घेत चौकशीत त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आले आहे., आसिफ बशीर पटेल वय ३७ रा. दहिगाव ता.यावल असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

यावल तालुक्यातील दहिगावातील पटेल वाड्यात रहिवास करीत असलेला आसिफ बशीर पटेल यास ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेची सुमारास ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी अंती त्याने चोरून आणलेल्या मोटारसायकली ज्या ज्या लोकांना कमी दरात विक्री केलेले आहेत त्यांची नावे त्याने पोलिसांना सांगितले. वरून पोलिसांनी त्वरित त्या लोकांच्या घरून मोटारसायकली ताब्यात घेतल्या ४ डिसेंबर रोजी ६ मोटारसायकली तर ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५ मोटारसायकली ताब्यात घेतल्या अशा एकूण ११ मोटर सायकल हस्तगत करुन जळगाव पोलिसांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत.आरोपी आसिफ हा गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मोटार सायकली जळगाव भागातून चोरून दहिगाव व सावखेडा सिम व ग्रामीण भागात विक्री करीत होता. चांगल्या परिस्थितीत असलेली मोटार सायकल ८ ते १० हजार जास्तीत जास्त १५ हजारापर्यंत विक्री करीत होता. हे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे ज्यांनी मोटरसायकली ताब्यात दिल्यात त्यांनी सुद्धा पोलिसांना याबाबतची माहिती दिली या कामी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे फौजदार राजू जाधव पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल सतीश पाटील, उमेश भांडारकर, राहुल पांचाळ, अमोल ठाकूर हे तपास करीत आहेत या प्रकरणात आणखी काही मोटारसायकली मिळतील असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे जळगाव पोलिसात आरोपी आसिफ पटेल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.