जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ एमआयडीसी परिसरात शुक्रवारी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह स्थानिकांनी पाहिल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला.पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेबाबत अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुषार चिंधू चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून तो अमळनेर शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तुषार चौधरी हे अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात राहणारा आहे. गेल्या गुरुवारी 5 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते घराबाहेर होते आणि तेव्हापासून ते घरी परतलेच नाहीत.शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तुषारचा मृतदेह आढळून आला. मृताच्याडोक्यावर गंभीर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहे. जखमांच्या खुणांवरून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोस्टमोर्टमच्या अहवाल आल्यानंतरच हत्येमागील खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून पोस्टमोर्टमनंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच हत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.