पहिल्या विवाहाचा घटस्फोट झाल्याचे भासवून केला दुसरा विवाह

पहिल्या विवाहाचा घटस्फोट झाल्याचे भासवून केला दुसरा विवाह

जळगाव : पहिला विवाह झालेला असताना घटस्फोट झाल्याचे भासवून भुसावळ शहरातील एका २९ वर्षीय महिलेशी लग्न केले. तसेच लग्नानंतर झालेला मुलगा दत्तक देण्यासाठी आग्रह करून तिचा छळ केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेचा २०१५ मध्ये पहिला विवाह झालेला होता. काही कारणास्तव त्यांचा २०२० साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर सचिन सैदाणे यांच्यामार्फंत त्यांचा विवाह शरद सैंदाणे यांचा सोबत २०२२ साली झाला होता. लग्नानंतर २०२३ साली पीडितेने मुलाला जन्म दिला. संशयित शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नसताना देखील तसे विवाहितेला भासवून दुसरे लग्न केले. विवाहितेला झालेले मुल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. शिवीगाळ करून मारहाण केली आणि अंगावरील दागिने देखील काढून घेतले. विवाहितेला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, अशा हर्षल सैंदाणे सर्व राहणार नांदेड ता. धरणगाव, सुनील सोनवणे, रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे (सर्व राहणार जामनेर), सचिन सैंदाणे राहणार नांदेड ता. धरणगाव हल्ली मुक्काम पुणे यांनी हा छळ व गुन्हा केला असल्याचे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणीचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.