प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या पंटरला तीन लाखाची लाच घेताना अटक

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या पंटरला तीन लाखाची लाच घेताना अटक

जळगाव | सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारीच्या पंटरला तीन लाखाची लाच घेताना संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांनी दिलेल्या माहितीवरून तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून 3 तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी इसम भिकन मुकुंद भावे वय, 52 वर्ष,आदर्श नगर प्लॉट ,नं 98 ,जळगाव याच्या मार्फत पंच साक्षीदारा समक्ष मेहरून तलाव जवळ, फ्लॅट न. 3, 10 लेक होम अपार्टमेंट , जळगाव येथे लाच स्वीकारली असता भिकन मुकुंद भावे व दीपक पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. पो.स्टे एम.आय.डी.सी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा सापळा यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर निरीक्षक अमोल धस पोलीस सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईकनवरे, पो. हेकॉ. अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, पोअंम, विलास चव्हाण सचिन बारसे, सी एन बागुल यांनी कारवाई केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.