बुलेटवरून पोल्ट्री शेडकडे निघाले, दिवसाढवळ्या माजी उपसरपंचावर हल्ला. गळा चिरून हत्या.

चव्हाण यांच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.

 सांगलीतील घानवड ता. खानापूर. येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गार्डी नेवरी रस्त्यावर दिवसाढवळ्या हा थरारक प्रसंग घडल्याने सर्वत्र खळखळ उडाली आहे. चव्हाण यांचा खून करून हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध विटा पोलीस करीत आहेत. चव्हाण हे पोल्ट्री तर विटा येथे सराफ व्यवसाय करत होते. काल दुपारी ते घानवड येथून गार्डी नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरून निघाले होते. ते गार्डीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अनोळखी व्यक्तीने खून केला.

चव्हाण यांच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून करून पसार झालेल्या हल्लेखोरांचा विटा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. बापूराव चव्हाण यांच्या खुनामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.