सात जणांच्या टोळक्याने तुरूंगात कैद्यावर केला जीवघेणा हल्ला.

रेल्वे सुरक्षा दलातून तुरुंगात आलेल्या एका बंदीवान कैद्यावर कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील सात कैद्यांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला, दगड आणि पत्र्याच्या बादलीचा वापर करून करण्यात आला आहे. या हल्ल्यातून कैदी थोडक्यात बचावला असून त्याच्या डोळे आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

रेल्वे सुरक्षा दलातून तुरुंगात आलेल्या एका बंदीवान कैद्यावर कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील सात कैद्यांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला, दगड आणि पत्र्याच्या बादलीचा वापर करून करण्यात आला आहे. या हल्ल्यातून कैदी थोडक्यात बचावला असून त्याच्या डोळे आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटनेच्या, कैद्याने दिलेल्या जबाबावरून खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, ज्या कैद्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे तो हरियाणा येथील रेल्वे सुरक्षा दलात नोकरीला असून, कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात एका गुन्ह्यात न्यायबंदी म्हणून दाखल आहे. हा न्यायबंदी जवान जेलमधील सार्वजनिक नळावर मंगळवारी सकाळी उभा होता. दरम्यान, त्याच्या शेजारीच जेलमधील अंतर्गत सेवेत रखवालदाराचे काम करणारा अन्य एक न्यायबंदी उभा होता. हे दोघेही उभे असताना अचानक रखवालदार असलेल्या न्यायबंदीच्या दिशेने जेलमधील इतर सात न्यायबंदी धाऊन आले. त्यांनी रखवालदार न्यायबंदीला मारहाण करण्यापूर्वीच जवान असलेल्या न्यायबंद्याने मध्यस्थी करून सातही जणांना तेथून परतून लावले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.