अभ्यासाच्या बहाण्याने बोलवलं, माजी सरपंचाकडून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार.

२ डिसेंबर रोजी पीडित विधार्थिनीने राहत्या घरातच कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असता, तिच्या नातेवाईकांनी तिला मुरबाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती पीडितेच्या आईला दिली. ठाण्यातील मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीतल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.

मुरबाडच्या नारिवली गावचा माजी उपसरपंच दयानंद भोईर याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने बोलावून आधी तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात दयानंद भोईर याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

डिसेंबर रोजी पीडित विधार्थिनीने राहत्या घरातच कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असता, तिच्या नातेवाईकांनी तिला मुरबाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती पीडितेच्या आईला दिली. त्यानंतर पीडितेची आई रुग्णालय जाऊन तिला आत्महत्या का करत होती. असा जाब विचारताच तिने ऑगस्ट महिन्यापासून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. खळबळजनक बाब म्हणजे पीडितेन आईला सांगितले कि तो व्यक्ती मला दहावीच्या अभ्यास विषयी मार्गदर्शनच्या बहाण्याने गावातील एका पडीक घरात बहाण्याने बोलवून माझ्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र त्याने धमकी दिल्याने मी त्यावेळी घडलेली घटना कोणाला सांगितली नाही त्यामुळं याचाच फायदा घेऊन नराधम माजी उपसरपंचाने पीडित विधार्थिनीवर वारंवार अत्याचार करीत होता. याच नरधामकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळं त्रास असहाय्य झाल्याने पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले

दरम्यान, पीडितेच्या ३५ वर्षीय आईने मुरबाड पोलीस ठाणे गाठून पीडित मुलीसोबत घडलेल्या घटनेविषयी कथन करताच मुरबाड पोलिसांनी २ डिसेंबर रोजी नराधम माजी उपसरपंचावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) सह पोक्सोचे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करत नराधम माजी उपसरपंचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे..मात्र या घटनेनंतर मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी नागरिक करीत आहेत. आहे..

  • Related Posts

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस आता याप्रकरणी तपास करत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाल्याने…

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.