एक्सल तुटल्याने तरूणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू

एक्सल तुटल्याने तरूणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू

जळगाव: गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे मॅकेनिक सोबत आलेल्या तरूणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. घटना मंगळवारी दुपारी जळगाव तालुक्यातील बोरनार गावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील बोरनार गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीचा एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होवून अपघात झाला. एक्सल दुरुस्तीसाठी एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथून मॅकेनिक ने सोमनाथ गोरख कोळी (वय २०, रा. भातखेडा, ता. एरंडोल) याला सोबत घेवून ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी मंगळवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावात आले. ट्रॅक्टरचा तुटलेला एक्सल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ट्रॉलीला जॅक लावून कामाला सुरुवात केली. मात्र काम सुरु असतांना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक निसटल्यामुळे दुरुस्तीसाठी मदत करणारा सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले, मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी तपासणी करीत मयत घोषीत केले

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.