देवरे विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
विखरण- नंदुरबार जिल्ह्यातील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाचे श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे राष्ट्रीय जंतनाशक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील उपशिक्षक व्ही.बी.अहीरे यांनी जंतांचे प्रकार,जंतांच्या प्रसाराचे प्रकार , जंताच्या प्रसाराचे चक्र,जंतुसंसर्गची लक्षणे,जंत दोषामुळे बालकांचे शिक्षण व दीर्घकालीन कार्यक्षमता यावर होणारे परिणाम याविषयी तसेच मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी जंत संसर्ग कसा थांबवावा ?जंतसंसर्गावर करावयाचे उपचाराविषयी माहिती दिली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या कश्या पद्धतीने घ्याव्यात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.