जलवाहिनी चोरी प्रकरणात उबाठाच्या नेत्याचे नाव समोर

जलवाहिनी चोरी प्रकरणात उबाठाच्या नेत्याचे नाव समोर

जळगाव | शहरातील गिरणा नदीच्या लगत असलेल्या पंपिंग स्टेशन वरून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या बीडच्या जुन्या पाईपलाईन जीसीपी ने खोदून चोरी केली जात होती. त्याप्रकरणी भंगार व्यवसायिकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेयामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचेही नाव त्यामध्ये आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील गिरणा नदीलगत असलेल्या पंपिंग स्टेशनवर पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या बीडची जुनी पाईपलाईन जेसीबीने काढून चोरी केली जात होती अशी माहिती ठेकेदार सुमित सोनवणे यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांना दिली. त्या ठिकाणी नरेंद्र पानगडे व रवण चव्हाण दोघे राहणार शिरसोली हे जेसीबी (क्रमांक एम हे च 32 पी 38 45) जुनी पाईपलाईन खोदून बीडचे धातूचे पाईप काढत होते. दरम्यान चौकशी करीत असताना चव्हाण यांनी तिथून पळ काढला व त्या ठिकाणी असलेल्या अक्षय अग्रवाल नामक व्यक्ती पोहोचला. ही पाईपलाईन अक्षय अग्रवाल व भावेश पाटील व अमित राठोड यांच्या सांगण्यावरून खोदली असल्याची माहिती चालक पानगळे यांनी दिली.तेथून काढलेले दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे सहा बिडाचे पाईप व दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे जेसीपी तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी योगेश बोरले यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नरेंद्र पानगळे, रवण चव्हाण, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमीन राठोड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या जबाब मध्ये सुनील महाजन हे नाव समोर आले. न्यायालयीन रिपोर्ट मध्ये सादर करताना सुनील वामन महाजन राहणार मिळवून जळगाव असे टाकण्यात आले आहे. मात्र जबाबत सुनील सुपडू महाजन असे नाव असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

  • Related Posts

    योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार  एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार  एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने…

    शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणा-या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    “आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील.

    “आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील.

    योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार  एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार  एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.