बियरची बाटली फुटल्यावरुन वाद अन् टोळक्याचं तरुणासोबत धक्कादायक कृत्य.

कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग समुद्र किनार्‍यावर धारदार शस्त्राने वार करत पोटात बिअरची बाटली खूपसून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर हे पर्यटनासाठी कोकणातील मोठं केंद्र आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या या समुद्र किनारा नेहमीच पर्यटकांनी फुललेला असतो. मात्र याच किनाऱ्याच्या समृद्धीला गालबोट लागेल, असा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग समुद्र किनार्‍यावर धारदार शस्त्राने वार करत पोटात बिअरची बाटली खूपसून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. शनिवारी रात्री मितेश जनार्दन पाटील या तरुणाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

या सगळ्या भयंकर प्रकारामुळे अवघा रायगड जिल्हा हादरला होता. आज याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अलिबागच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या दोन दिवसांत या तीन आरोपींना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी राज रमण जयगडकर, प्रथमेश शेखर घोडेकर, प्रमोदकिसन साठविलकर तेही राहणार साखरी आक्षी तालुका अलिबाग येथील आहेत.अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून मितेश जनार्दन पाटील या तरुणाची हत्या करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात गडद चिरबे येथे राहणाऱ्या मितेश व त्याचा मित्र प्रथमेश पाटील हे दोघेही शनिवारी रात्री अलिबाग बीचवर आले होते. यावेळी दोघेही रात्री उशिरा बियर पिण्यासाठी बसले होते. यावेळी मद्यप्राशन करताना मितेशच्या हातातील बाटली सटकली आणि ती फुटली मग याचा मोठा आवाज झाला. यावेळी त्याठिकाणी शेजारी दारू पिण्यासाठी बसलेल्या अन्य पाच जणांच्या टोळक्याने मितेश व त्याच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचवेळी दोघांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी मितेश व त्याचा मित्र प्रथमेश या दोघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी मारहाण करणाऱ्या टोळक्यामधील एकाने मितेशच्या खांद्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या निर्दयीपणे केलेल्या मारहाणीत मितेश हा गंभीररित्या जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांचे पथक तपासकिता नियुक्त करण्यात आले होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे. तर अटक करण्यात आलेल्या तिघांनीही या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या सगळ्या धक्कादायक घटनेचा तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.