गृहमंत्रिपद सोडा तुम्हाला ही दोन खाती देतो, शिंदेंसमोर भाजपचा नवा प्रस्ताव.

विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं होतं. पण, अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही. ५ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तरी, मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. आज, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक होत आहे. या बैठकीनंतर विधीमंडळाची बैठक पार पडेल. त्यामध्ये विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला दिसत आहे. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. फडणवीसांनी थेट वर्षा बंगला गाठत शिंदेंची भेट घेतली. पाऊण तास या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर राज्याचं गृहखातं हे फडणवीसांकडेच राहणार हे ठरल्याचं सूत्रांच्या माहितीने समोर आलं आहे.

शिंदे-फडणवीसांच्या बैठकीतही मंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला दिसत नाही. त्यामुळे आज बुधवारी पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपद हे फडणवीसांकडे राहावं अशी भाजपची इच्छा आहे. त्याबदल्यात शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यासह नगरविकास खातं आणि आणखी एक खात्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तसा प्रस्ताव एकनाथ शिंदेंपुढे ठेवण्यात आला आहे. आता यावर शिंदे काय निर्णय घेतात हे अद्याप समोर आलेलं नाही. 
शपथविधी सोहळा आता काही तासांवर आला आहे. त्यामुळे आज मंत्रिपदाच्या तिढ्यावर आज निर्णय होणे अपेक्षित आहे. दरम्यान, भाजपकडून आज विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचाय नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.