कोकणातील जनरेशन नेक्स्टचे मंत्रिमंडळात ‘कदम’, जुने-जाणते साफ एकदम?

कोकणातून दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम ही महायुतीतील नावं मंत्रिमंडळासाठी चर्चेत आहेत.निवडणुकीच्या निकालानंतर अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ उद्या स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचे निश्चित मानले जाते. हा भव्य शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. यासाठी कोकणातूनही काही मान्यवर मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जगद्गुरु स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनाही विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या नव्या सरकारमध्ये आता कोकणातून कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. कोकणातून दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम ही महायुतीतील नावं मंत्रिमंडळासाठी चर्चेत आहेत.


शिवसेनेकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. मात्र कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत व रायगडमधून शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भरत गोगावले, अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांच्या सुकन्या आदिती तटकरे ही तीन नावं निश्चित मानली जातात. मात्र या मंत्रिमंडळात तळ कोकणातील सावंतवाडी मतदारसंघाचे दीपक केसरकर यांना पुन्हा संधी मिळणार किंवा कसे हे पहावे लागणार आहे. आमदार भरत गोगावले यांची संधी महायुतीच्या पहिल्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये हुकली होती त्यामुळे नाराज असलेल्या गोगावले यांना संधी देण्यासाठी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना प्राधान्याने विचार करावा लागणार आहे.मंत्रिमंडळात युवा वर्गाला स्थान देण्यासाठीही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विचार करवा लागणार आहे. यामध्ये अदिती तटकरे व उदय सामंत ही दोन नावं निश्चित झाली आहेत. याचवेळी आणखी एका नव्या युवा नेत्याला संधी मिळू शकते. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र दापोलीचे आमदार योगेश कदम हे कोकणातील सगळ्यात युवा आमदार म्हणून ओळखले जातात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील जाहीर सभेत ‘तुम्ही योगेशला आमदार करा मी नामदार करतो’ असा शब्द जाहीर सभेत दिला होता. आता या शब्दाची वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करतात का याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात भाजपकडून स्थान दिले जाऊ शकते. त्यांची ही तिसरी टर्म आहे व हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. नितेश राणे यांनी राज्यभर सभा गाजवल्या आहेत. मुंबईतही त्यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्यासारख्या युवा नेत्याला महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान हे निश्चित मानले जाते. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, की त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देऊन मंत्रिमंडळातून नारळ देणार अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोकणातून कोणाकोणाला संधी मिळते याकडे अवघ्या कोकणाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.