गटनेतेपदी निवड झाल्यावर पहिल्या भाषणात फडणवीसांनी आमदारांना स्पष्टच सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. यामुळे तेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील. फडणवीसांनी पक्षाचे आभार मानले आणि जनतेचा जनादेश हा आनंद आणि जबाबदारी असल्याचे म्हटले. यावेळी फडणवीसांनी गटनेता झाल्यावर दमदार भाषण केले.भाजप विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सर्व आमदारांनी त्यांची निवड केल्याने आता महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. बुधवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळामध्ये गटनेतेपदी निवड झाली आहे. फडणवीसांची गटनेता म्हणून निवड झाल्यावर आपल्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले. जनादेशाबाबत इतकंच म्हणेल आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली असून महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकमताने विधीमंडळ गटाचा नेता म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार. यावेळची निवडणुक अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर ठेवली आहे ती म्हणजे ‘एक है तो सेफ है’ आणि ‘मोदी है ते मुनकीन है’. मोदींच्या नेतृत्त्वामध्ये विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारंच मँडेट जनतेने आपल्याला दिलं आहे. आपल्यासोबत पूर्णपणे तनमनाने असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्रपक्षांचे आभार. आपण ज्या संविधानाच्या प्रक्रियेतून निवडून येतो या संविधानाची ७५ वर्षे पू्र्ण होत आहेत. मोदी कायम सांगतात कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचे संविधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जनतेने मोठा जनादेश दिला आहे. आता या जनादेशाबाबत इतकंच म्हणेल आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली आहे. सगळ्यांनी दिलेल्या जनादेशाचं सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.आपल्याला अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे महायुती सरकारमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन आणि प्रसंगी सगळ्या गोष्टी सर्वांच्या मनाच्या करता येत नाहीत. पदांकरता आपण राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे चार गोष्टी मनासारख्या आणि मनाविरूद्ध होतील. पण तरीदेखील आपण सगळेत एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ते दाखवून देऊ. महाराष्ट्रातील सर्व समाजाला अश्वस्त करतो आमचं सरकार २४ तास काम करेल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे आणण्याकरता आपल्याला सातत्याने काम करावं लागणार आहे. २०१९ ला बेईमानी झाली पण जुन्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही. पण गेला नाही. त्यावेळी सगळे आमदार संघर्ष करत होते. मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. महाराष्ट्रात एक अभूतपूर्व इतिहास लिहिला गेला. माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणूम काम सुरू केलेल्या कार्यकर्त्याला मोदींनी मला मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यासोबतच जे. पी. नड्डा आणि या निवडणुकीमध्ये सुरूवातीपासून अतिशय ताकदीने महाराष्ट्रात तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली ते अमित शहांचेही आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.