सुनील शेळके आणि संग्राम जगताप यांची लागणार वर्णी. महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला सरळ बहुमत मिळाल्यानंतर शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरलाय. विशेष म्हणजे महायुतीला सरळ बहुमत मिळालंय. राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 5 डिसेंबर रोजी शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पोहोचणार आहेत. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. सुरूवातीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा केला. आता हे स्पष्ट आहे की, भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आहे.

शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे स्पष्ट आहे. आता राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी पुढे येताना दिसतंय. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांचे मंत्रीपदे कायम राहणार आहेत. नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, संग्राम जगताप, सुनील शेळके, इंद्रनील नाईक, दत्ता भरणे, अनिल पाटील यांचीही नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असण्याची शक्यता आहे. आता मंत्रीपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. महायुतीच्या नेत्यांची बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. शपथविधीच्या अगोदरील या बैठकीला महत्व आले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदे येतात, हे आता स्पष्ट होईल. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केलीये.सुनील शेळके यांनी मावळमधून निवडणूक लढवली. मोठ्या मत्ताधिक्याने ते निवडून आले. सुनील शेळके आणि संग्राम जगताप यांची मंत्रीपदावर वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. सुनील शेळके यांनी अनेक वर्ष भाजपा युवा मोर्चामध्ये काम केले. त्यांनी विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रवादीकडून लढवली. यासोबतच अजून काही नावे मंत्रीपदासाठी चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. भाजपाकडूनही अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.