भाजपच्या महिला नेत्याने उचलले टोकाचे पाऊल, पोलिस तपास सुरू.

भाजपा महिला नेत्याने थेट आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. आपल्या मित्राला फोन करत तणावात असल्याने दीपिका पटेल यांनी सांगितले. मात्र, दीपिका पटेल यांनी आत्महत्या नेमकी का केली, याबद्दल अजून खुलासा होऊ शकला नाहीये. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.: एक धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाच्या एका महिला नेत्याने थेट गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रात्री उशीरा उघडकीस आली. गुजरातमधील सूरत येथील भाजप महिला आघाडीच्या नेत्या दीपिका पटेल (वय ३०) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ज्यावेळी दीपिका यांनी आत्महत्या केली, त्यावेळी त्यांचा पती घरी नव्हता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणताही प्रकारची सुसाइट नोट मिळाली नाहीये. दीपिका यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने एका भाजपाच्या नेत्याला फोन करत आपण तणावात असल्याचे म्हटले होते. घटनेपूर्वी दीपिका पटेलने वॉर्ड 30 चे नगरसेवक चिराग सोलंकी यांना फोन केला होता. यावेळी दीपिकाने आपण तणावात असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले. यानंतर चिराग यांनी थेट दीपिका पटेल यांच्या घरी धाव घेतली. यावेळी त्यांनी घराचा दरवाजा वाजवला. मात्र, आतमधून प्रतिसाद मिळत नव्हता.दरवाजा तोडला असता दीपिकाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर दीपिका यांना लगेचच रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल आला असून फाशीमुळेच दीपिका यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दीपिका यांचा फोन पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी काही मोठे खुलासे होऊ शकतात, असेही बोलले जातंय.दीपिका पटेल यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, दीपिका बऱ्याच वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणा सक्रिय होती. नेहमीच तिची हत्या होईल अशी भीती असायची. दीपिका पटेल यांच्या आत्महत्येनंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. पोलिसांकडून शेजारी आणि नातेवाईकांची चाैकशी केली जातंय. दीपिका यांच्या मोबाईलमधून काही महत्वाचे पुरावे पोलिसांना मिळतात का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, दीपिका यांच्या आत्महत्येनंतर मोठा धक्का लोकांना बसला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.