संजय राऊत संतापले, मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानास प्रशासनाचा विरोध.

 सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मते विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. प्रशासनाने कलम १४४ लागू केले असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरात सोलापूर जिल्ह्यमधील माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी ग्रामस्थांनी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला. मारकडवाडीमध्ये शरद पवार गटाचे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना अपेक्षित मते न मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं आहे. राज्यात निकाल लागून अद्यापही सरकार स्थापन झाले नसताना ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मतदान करण्याचा निर्णय घेतला. मात्र याला प्रशासनाचा विरोध असून कलम १४४ लागू केलं आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मारकडवाडी गावामध्ये १४४ कलम लावलं गेलं आहे. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. राज्यामध्ये यांचं सरकार यायचंय, माळशिरसमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. पण लोकांना वाटत आहे की विजयी उमेदवाराला मिळालेली मते कमी आहेत. हा महत्त्वाचा विषय असून जिंकूनसुद्धा ते मतदान घेत आहे. ही मतदानप्रक्रिया बेकायदेशीर नाही, आम्हाला अधिकार असून निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायला लावत आहोत का? आमच्या समाधानासाठी गावात नक्की काय झालं हे आम्ही ठरवत आहोत. ज्याला मतदान होऊ नये अशी आमची भूमिक होती जर त्या उमेदवाराला मतदान झालं असेल तर गावाने मॉक पोल घेण्याचं ठरवल्याचं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये लोकांनी ठरवलं आपण बॅलेटवर मतदान करून आपल्या गावचा कौल काय आहे ते निवडणूक आयोगाला दाखवायचंय. अशा परिस्थितीत मिळालेल्या बहुमतावर सरकार स्थापन करायला निघालेत त्यांचा विश्वास बसत नाहीये आणि तेही गोंधळलेले आहेत. राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसांनंतर बहुमत असलेला पक्ष राज्यपालांकडे जाऊन दावा करत नाहीत. आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाहीत. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अजून निमंत्रण दिले नाही. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष शपधविधीची तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते. मंडप घातला जातो, कार्पेट टाकला जातो हा काय प्रकार आहे असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.